औरंगाबाद: समृद्धी महामार्गाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचीही उपस्थिती होती.
नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता या महामार्गाच्या कामात लक्ष घातल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. समृद्धी महामार्गाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू करण्याच्या सूचनाही वाघमारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भूसंपादन, जमिनीचा मोबदला, न्यायालयीन प्रक्रियेतील बाबींची माहिती यावेळी वाघमारे यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. या महामार्गाच्या कामासाठी पैसे पडू कमी पडू दिले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. औरंगाबाद सह वैजापूर गंगापूर या तालुक्यातील मजबुती करण्याच्या कामाला प्रारंभही करण्यात आला आहे. या कामाच्या प्रगतीबाबत वाघमारे यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी महसूल बांधकाम यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.








